ब्रह्मीभूत हरभटबाबा पटवर्धन
सु. १६५५ – सु. १७५० · हरिवंश पटवर्धनांचे मूळपुरुष
- जन्म
- कोतवडे, गणपतीपुळ्याजवळ (रत्नागिरी)
- पुत्र
- कृष्णभट, बाळंभट, त्र्यंबक हरी, गोविंद हरी, महादेवभट, रामचंद्र हरी, भास्कर हरी
- समाधी
- ओंकारेश्वराजवळ, पुणे
गणपतीपुळे येथे दीर्घ तपश्चर्या करणारे गणेशभक्त हरभटबाबा वयाच्या सुमारे चाळिसाव्या वर्षी कोकण सोडून देशावर आले. कापशी येथे ते सेनापती संताजी घोरपडे यांचे निकटवर्ती आणि पुढे इचलकरंजीचे अधिपती झालेल्या जोशी घराण्याचे उपाध्याय झाले आणि त्यांना कुरुंदवाड इनाम मिळाले. तेथे कृष्णाकाठी त्यांनी गणेशवाडी येथे गणेशमंदिर बांधले.
पेशव्यांनी त्यांचे पुत्र गोविंद हरी व रामचंद्र हरी यांना सरदार केल्यावर घराणे उपाध्यायपणाकडून शिपाईगिरीकडे वळले. पेशव्यांनी हरभटबाबांना आपल्यासोबत राहण्याचे निमंत्रण दिले; ते त्यांनी नम्रपणे नाकारले, पण अखेरच्या काळात ते पुण्यात स्थायिक झाले आणि सुमारे त्र्याण्णव वर्षांच्या वयात तेथेच निवर्तले. त्यांच्या सात पुत्रांपासून मिरज, सांगली, कुरुंदवाड, जमखंडी, तासगाव, चिंचणी, आंबा, मंगळवेढा व शेलसत येथील पटवर्धन शाखा निर्माण झाल्या.

















